खूप मोठं घर, खूप भव्य शॉपिंग मॉल, चकचकीत गाड्या. सिनेमात नाही आता या गोष्टी प्रत्यक्षातही सहज बघायला मिळतात.
पण नाही बघायला मिळत तो आनंद, समाधान... धावणारे यंत्रवत चेहरे जिकडे तिकडे दिसतात आणि त्यांच्या धावण्याला कुणाचा आक्षेपअसण्याचं कारण नाही. पण ते एकटेच धावत असतात का? प्रत्येक माणसाला जन्मजात एक घर.. एक कुटुंब चिकटलेल असतं आणि ते ही नकळत त्याच्या मागे धावत असतं, कारण नसतांना! किंबहुना फरफटत असतं.
आपल्या या धावपळीत आपल्या वेगाने मुलं नाही धावू शकणार हेही विसरून जातो आपण... खिडकीत जसा मनी प्लांट असतो ठेवलेला, भविष्याच्या आशेने किंवा बरा दिसतो म्हणून... तशीच मग मुलही डोकावताना दिसतात खिडकीत. फार फरक वाटत नाही मनी प्लांट च्या रोपात आणि मुलांमध्ये.
हे चित्र कुठे तरी घट्ट रुतून बसलं मनात.
जगात शांतता नांदावी आणि समृद्धी असावी, असं काहीबाही वाचताना आपल्या घरात डोकावण्याची सवड का काढत नाहीत लोकं, हासाधा प्रश्न अस्वस्थ करायचा. घरात लहान मुलाच्या रूपाने एक अस्वस्थ पिढी वाढतेय. आई बाबांचा वेळ मिळत नसल्याने हिंसक video गेम खेळण्यात रमलेली मुलं निरखून बघताना निरागसपण हरवत असल्याची जाणीव मन पोखरू लागली.
दलाई लामा म्हणतात तसं आजकाल फक्त घर मोठं होऊ लागलय आणि कुटुंब छोट. औषधी खूप आहेत, पण आरोग्य हरवत चाललंय. किती सहज त्यांचे शब्द बरेचं काही सांगून गेले.
मग हे विचार चित्रासारखे डोळ्यांसमोर तरळू लागले. अवतीभवती भर गर्दीतही एकाकी माणसांचे चेहरे अस्वस्थ करायला लागेल. काही क्षण अंगणात गोंधळ घालणारी चिमणीही आपल्या पावलांची सुंदर नक्षी मांडून जाते. आणि हे विचार तर डोक्यात कल्लोळ माजवत आहेत... गेले काही वर्ष! ह्यांचा एक वेडा वाकडा कोलार्जही छळतो कधी. मग ह्याला एक रूप देऊन बघायला काय हरकत आहे?
या पिढीला गर्दीतही छळणारा हा एकांत आणि ही पोकळी चित्रात जिवंत होऊ लागली... जगाच्या स्पर्धेत आपण मागे पडू नये म्हणून सतत धावणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये लपलेलं डॅंबिस मुल हळू हळू धावू लागल डोळ्यासमोर... आणि हि सगळी चित्र चौकट साकारायला मी ओढलागेलो....माझ्या ही नकळत!
- मकरंद अनासपुरे
For More Detail Visit
http://mazzacinema.com/dambis.html

मकरंदजीचे काही संवाद खरोखर मनाला भिडतात. जसा वर दिलेला संवाद आहे. खरोखर आज अशीच परीस्थिती समाजाची झाली आहे. मनोरंजनाची साधने अमाप आहेत पण मनाला भिडणारा आनंद कशात प्राप्त होईल ते कुणालाच गवसत नाहीये. सोशल नेटवर्किंग वरच्या आभासी दुनियेत तासन तास रमणारे आजूबाजूला काय चालू आहे त्यापासून अनभिज्ञ आहेत.लहान मुलांना कार्टून ची नावे पाठ आहेत पण काका,मामा सारख्या जवळच्या व्यक्तींना ते ओळखत नाहीत. समाजाची शैक्षणिक पातळी वाढत आहे पण नैतिक आणि वैचारिक पातळी खालावत आहे. अशा समाजाला प्रबोधन करण्याची गरज तर आहेच पण ते प्रबोधन समाजाने आत्मसात करण्याची पण गरज आहे. त्यामुळे समाजाला काही संदेश देणारा चित्रपट काढत असल्याबद्दल मकरंदजीचे अभिनंदन... चित्रपट खूप यशस्वी होवो हि शुभकामना...
ReplyDelete